Breaking News
दिल्ली ठरले जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर
पर्यावरण
मुंबई -:गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा अति धोकादायक पातळीवर गेली आहे. यामुळे काल न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी ४ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४३८ वर गेला होता. दिल्लीची गणना जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर म्हणून झाली आहे. जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्येही देशातील ८ शहरांचा समावेश होता.जगातील पहिल्या दहा सर्वांधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरांचा समावेश आहे. दिल्लीपाठोपाठ उत्तर भारतातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता वाईट किंवा अति धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार प्रदूषित शहरे नवी दिल्ली ४३८, हापूर (उत्तर प्रदेश) ४३०, भिवानी (हरियाणा) ४०४, दकिंग (चीन) ३९८, गुरुग्राम (हरियाणा) ३८३, गझियाबाद (उत्तर प्रदेश) ३६५, सोनीपत (हरियाणा) ३५१, मेरठ (उत्तर प्रदेश) ३५१, अद दिरियाह (सौदी अरेबिया) ३४४, नोएडा (उत्तर प्रदेश) ३४१ असा हवा गुणवत्ता निर्देशांक आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar