Breaking News
मोदी साधणार महाराष्ट्रातील एक लाख बूथ प्रमुखांशी संवाद
मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘माझा बूथ, सर्वात मजबूत’ या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी महाराष्ट्रातील भाजपाच्या सुमारे 1 लाख बूथ प्रमुखांशी नमो ॲपच्या माध्यमातून आणि ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपाच्या निवडणूक प्रचार मोहिमेला बळ देण्यासाठी आणि बूथ स्तरापर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी पंतप्रधान बूथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमाद्वारे पक्षाच्या संघटन व्यवस्थेमधील महत्वाचा घटक असलेल्या प्रत्येक बूथ च्या प्रमुखांशी संवाद साधत पंतप्रधान निवडणूक प्रक्रीयेतील प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका विषद करतील. बूथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक निर्देशही देणार आहेत. यावेळी बूथ प्रमुखांना देखील त्यांचे विचार नमो ॲप द्वारे थेट पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे.
‘माझा बूथ, सर्वात मजबूत’ या विशेष संवादात बूथ प्रमुखांना नमो ॲपच्या माध्यमातून आणि ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येईल. तसेच त्यांना आपल्या सूचना, प्रश्न आणि विचार http://narendramodi.in/mbsmmh या लिंकद्वारे थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचविता येतील.
बूथ प्रमुखांशी संवाद साधण्यास उत्सूक – पंतप्रधान
विधानसभा निवडणूकीत भाजपा – महायुतीला प्रचंड मतांनी विजय मिळवून देण्यासाठी पक्षाचा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता अथक परिश्रम घेत आहे. 1 लाख बूथ प्रमुखांशी 16 नोव्हेंबर ला संवाद साधण्यासाठी मी उत्सूक असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade