मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शनीच्या चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

शनीच्या चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

मुंबई - विश्वाच्या अफाट पसाऱ्यात पृथ्वीप्रमाणेच जीवसृष्टी असलेला ग्रह असू शकतो, अशी शक्यता खगोल अभ्यासकांकडून वारंवार वर्तवली जाते. यादृष्टीने सातत्याने शोध सुरू असतो. आता शनीच्या चंद्रावर जीवसृष्टी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शनीचा सर्वात मोठा चंद्र टायटनच्या वरच्या घन पृष्ठभागाखाली मिथेन वायू दडलेला असल्याचा दावा हवाई विद्यापीठातील ग्रहशास्त्रज्ञांच्या टीमने केला आहे. पृथ्वीवर, सायबेरिया आणि आर्क्टिक समुद्राच्या तळाच्या पर्माफ्रॉस्टखाली मिथेन क्लॅथरेट हायड्रेट्स आढळतात. तसे तर टायटन हा सौरमालेचा उपग्रह मानला जातो जिथे जीवसृष्टी असण्याची सर्वाधिक शक्यता असू शकते. पृथ्वीनंतर हे एकमेव असे ठिकाण आहे जिथे वातावरण अस्तित्वात आहे आणि नद्या, तलाव आणि समुद्राच्या रूपात द्रव पदार्थ अस्तित्वात आहेत.

संशोधकांचे म्हणणे आहे की, टायटनचे खड्डे अंदाजापेक्षा शेकडो मीटर उथळ आहेत. त्यापैकी केवळ 90 जणांची ओळख पटली आहे. पण गंमत म्हणजे येथे खोल खड्डेही असू शकतात, ज्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मिथेन क्लेथरेट किंवा मिथेन हायड्रेट हे एक घन संयुग आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिथेन गाडले जाते. ही एक क्रिस्टल प्रकारची रचना आहे, जी पाण्यासारखी दिसते आणि गोठलेल्या बर्फासारखी दिसते. मिथेन चॅथरेटच्या अभ्यासातून टायटनचे कार्बन चक्र समजून घेऊन तेथील बदलत्या हवामानाची माहिती गोळा करता येईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट