मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

हलक्या वाहनाच्या परवान्यावर आता छोटे ट्रक टेम्पो चालवण्यास परवानगी

हलक्या वाहनाच्या परवान्यावर आता छोटे ट्रक टेम्पो चालवण्यास परवानगी 

नवी दिल्ली - हलकी वाहने चालवण्याचा म्हणजेच एलएमव्ही परवाना धारक व्यक्ती साडेसात हजार किलो पर्यंतच्या वजनाची जड वाहने चालवू शकतात असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे हलक्या वाहनाच्या परवान्यावर आता छोटे ट्रक टेम्पो चालवता येणार आहेत.सर्वोच्च न्यायालयात बजाज अलांयस जनरल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध रंभा देवी व अन्य या खटल्यासह इतर ७६ खटल्यांच्या सुनावणी दरम्यान घटनापीठाने हा निर्णय दिला.

या घटनापीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, पीएस. नरसिंहा, पंकज मिथल व मनोज मिश्रा होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, साडेसात हजार किलोपेक्षा कमी असलेली सर्व वाहने ही हलकी वाहने आहेत. त्यामुळे हलकी वाहने चालवण्याचा परवाना असलेला व्यक्ती ही वाहने चालवू शकतात. हलक्या वाहनांच्या परवानाधारकांकडून जड वाहने चालवल्यामुळे झालेल्या अपघातांची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र विमा कंपन्यांकडून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. घटनापीठासमोर एकूण ७६ खटल्यांची सुनावणी करण्यात आली. हा मुद्दा वाहन चालकांच्या उपजिवीकेशीही संबंधित आहे. हे सर्व लक्षात घेऊन हा निर्णय दिला आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट