मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे

2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे

मुंबई - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिलेल्या राज ठाकरे यांनी विधानसभेत मात्र, स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत १३८ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, असे असले तरी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघात पाठिंबा द्यावा, अशी भूमिका भाजपानं आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनीही घेतली आहे तर यंदा मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीसच होतील तेही आमच्या पाठिंब्याने अशी भूमिका आज राज ठाकरे यांनी मांडली आहे.महायुतीने बाळा नांदगावकर उमेदवार असलेल्या शिवडीच्या जागेवरही उमेदवार दिलेला नाही.

एकीकडे महायुतीकडून मनसेला सहकार्याचं धोरण दिसत असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनसेच्या सहकार्यानं पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल, असे भाकित केले आहे. राज्यात महायुतीची सत्ता येईल असे सांगत त्यांनी महायुती – मनसे यांच्यातला हा छुपा दोस्ताना निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगळी समीकरणं घेऊन येणारा ठरेल असेच जणू सुचविले आहे .यामुळे मनसेला पहिल्यांदाच सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळेल का याचे उत्तर तेवीस नोव्हेंबरला मिळेल.राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजपानेही मनसेला दिलासा देणारे वक्तव्य केले. माहीम मतदार संघातले मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना भाजपाचा पाठींबा असल्याची भूमिका भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना मांडली. माहीम मध्ये उमेदवार उभा न करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मत होते असेही फडणवीस यांनी सांगितले यामुळे भाजपा आणि मनसे यांच्यात तुझ्या गळा माझ्या गळा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट