मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

श्रीकांत शिंदेचा उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार?

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे कल्याणमधील खासदार श्रीकांत शिंदे यांनी नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याच्या शक्यतांना ‘निराधार’ ठरवून फेटाळून लावले.

”मी उपमुख्यमंत्री होणार या वृत्तावर गेल्या दोन दिवसांपासून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरे तर त्यात कोणतेही तथ्य नाही आणि माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आहेत, असे त्यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिंदे यांनी नमूद केले की महाआघाडी सरकारचा शपथविधी सोहळा होण्यासाठी थोडा उशीर झाल्यामुळे बरीच चर्चा आणि अफवा पसरल्या आहेत. ते म्हणाले की, काळजीवाहू मुख्यमंत्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती घेण्यासाठी दोन दिवस त्यांच्या गावी गेले होते. त्यामुळे अफवांना पेव फुटले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतरही केंद्र सरकारमध्ये मंत्री होण्याची संधी असल्याचे ते म्हणाले. पण मी पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा विचार केला आणि तेव्हाही मंत्रिपद नाकारले. मला सत्तेत पदाची इच्छा नाही. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मी राज्यातील कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. मी फक्त माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेनेसाठीच काम करणार आहे.

शिंदे म्हणाले की, प्रसारमाध्यमांमधला उत्साह आणि स्पर्धा आपल्याला समजत असतानाच त्यांनी वार्तांकन करताना वास्तवाकडे पाठ फिरवू नये, अशी विनंती केली. "माझ्याबद्दलच्या चर्चा आता तरी थांबतील अशी माफक आशा आहे," असेही ते पुढे म्हणाले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले, ज्यात भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांचा समावेश असलेल्या महायुती आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, आपल्या घटक पक्षांमध्ये चर्चा बैठका होऊनही महायुतीने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित केलेला नाही.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट