Breaking News
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर जर्मन सरकारकडून भारतीयांसाठी मोठी घोषणा
नवी दिल्ली - शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर यांच्यात भेट झाली. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ भारत दौऱ्यावर आले आहेत. पीएम मोदींनी जर्मनीच्या या घोषणेची माहिती दिली. जर्मनीने भारतीयांसाठी नोकरीची बाजारपेठ खुली केली आहे. जर्मन सरकार आता दरवर्षी ९० हजार भारतीयांना वर्क व्हिसा देणार आहे. आतापर्यंत या श्रेणीत 20 हजार भारतीयांना व्हिसा मिळत होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत व्हिसाच्या संख्येतही वाढ होऊ शकते.
18 व्या आशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस (APK- 2024) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर्मनीने प्रशिक्षित भारतीयांसाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या व्हिसाची संख्या 20 हजारांवरून 90 हजार करण्याचा निर्णय घेतलाय. मला विश्वास आहे की यामुळे जर्मनीसाठी देखील नवी चालना मिळेल. जर्मनी ही केवळ युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था नाही, तर युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत त्याच्या आर्थिक विकास दराची शक्यता देखील सर्वोत्तम आहे.
युरोपातील इतर देश आर्थिक मंदीच्या समस्येशी झुंज देत असताना, जर्मनी मात्र मजबूत स्थितीत आहे. त्यांना वेगवान आर्थिक विकास दराचा वेग कायम ठेवण्यासाठी काम करणाऱ्यांची गरज आहे. चॅन्सेलर स्कोल्झ यांनी भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध दृढ करण्याला देखील प्राधान्य दिले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade