Breaking News
अरेरे.... किती गलिच्छ ....महिन्यातून दोनदाच धुतले जातात रेल्वेतल्या चादरी, ब्लॅंकेट , RTIमुळे झाले उघड
महानगर
मुंबई - रेल्वेतून प्रवास करताना AC डब्यातील प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट्स प्रत्यक्षात किती वेळा धुतली जातात? हे तुम्हाला माहितेय का? ती महिन्यातून एकदाच किंवा दोनदा धुतली जातात. वाचूनच अंगावर काटा आला असेल ना. पण हे खरं आहे. आपण एसी ट्रेनमध्ये प्रवास करताना रात्री जी चादर वापरतो ती किती स्वच्छ असेल याची आता कल्पनाही करवत नाही.
याबाबत एका RTI अंतर्गत रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात धक्कादायक माहिती समोर आली. त्यात सांगण्यात आलं की, ‘ब्लँकेट्स कमीत कमी महिन्यातून एकदा आणि शक्य असल्यास दोनदा धुतली जातात.’ परंतु हा निर्णय लॉजिस्टिकच्या सुविधांवर अवलंबून असतो.
रोज प्रवाशांची सेवा करणाऱ्या जवळपास 20 ट्रेनमधील हाऊसकीपिंग स्टाफशी संवाद साधल्यावर असं आढळलं की, ब्लँकेट्स मासिक स्वरूपातच धुतली जातात. ‘जर ब्लँकेट्सवर वास येत असेल किंवा ती घाण झाली असेल, तरच ती धुण्यासाठी पाठवली जातात,’ असं अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant