Breaking News
...तर मुंबई जाईल पाण्याखाली
मुंबई - धारावी पुनर्विकास प्रकल्पातंर्गत अपात्र रहिवाशांना वडाळा, भांडूप, मुलुंडसह उर्वरित ठिकाणी हलविण्याचा घाट घातला जाणार असून, यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अशा मिठागराच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे. मात्र, यास पर्यावरण अभ्यासकांनी विरोध दर्शविला असून, मिठागरसह तत्सम जमिनीवर बांधकामे केली गेली, तर भविष्यात मुंबई पाण्याखाली जाईल, अशी भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीत आता पुन्हा एकदा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा गाजू लागला आहे. धारावीकरांनी धारावीतच घराची मागणी केली असून, दुसरीकडे अपात्र रहिवाशांना उर्वरित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. यासाठी वडाळा, भांडूपसह मुलुंड आणि इतर जागांचा विचार सुरू आहे. वॉचडॉग फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, जेव्हा विकास आराखड्यात मिठागराच्या जमिनी खुल्या करण्याचा प्रस्ताव आला तेव्हाच विरोध केला होता. मुंबईच्या चारही बाजूला कांदळवने किंवा तत्सम जमिनी आहेत. पूर्वेकडे वडाळ्यापासून ठाण्याच्या खाडीपर्यंत कांदळवनाचे जंगल आहे. भरतीवेळी समुद्राचे पाणी कांदळवनामुळे थोपविले जाते. त्यामुळे पूर येत नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade