Breaking News
किर्लोस्करांची लेक सांभाळणार टाटांच्या या कंपनीची जबाबदारी
मुंबई,- प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर आता टाटा कंपनीची धुरा नोएल टाटा हे त्यांचे बंधू सांभाळणार आहेत. टाटांच्या विविध कंपन्यांची जबाबदारीही आता नवीन व्यक्तींकडे सोपवली जात आहे. यामध्ये प्रख्यात मराठी उद्योजक घराण्याची लेक मानसी किर्लोस्कर ही महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे. मानसी ही नोएल टाटा यांची सुन आहे. नोएल टाटा यांचा एकुलता एक मुलगा नेविल टाटा यांचे 2019 मध्ये मानसी किर्लोस्करसोबत लग्न झाले. मुंबईतील रतन टाटा यांच्या घरी लग्नाचे विधी पार पडले. मानसी ही उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांची मुलगी आहे. किर्लोस्कर समूह आज विविध प्रकारच्या व्यवसायांमध्ये आहे. किर्लोस्कर समूहाच्या अनेक कंपन्या आहेत. टोयोटा मोटर कंपनी यापैकी एक आहे.टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) या कंपनीचे नेतृत्व नोएल टाटा यांची सून मानसी किर्लोस्कर करत आहे.
विक्रम किर्लोस्कर यांचे 2023 मध्ये निधन झाले. यानंतर मानसी यांना किर्लोस्कर ग्रुप ताब्यात घेण्यासाठी पुढे यावे लागले. टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्ट्सची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्या दोन्ही कंपन्यांच्या त्या उपाध्यक्षा आहेत. या समूहाच्या इतर अनेक कंपन्यांमध्येही त्याची मोठी भूमिका आहे. यामध्ये किर्लोस्कर टोयोटा टेक्सटाईल, टोयोटा इंजिन लिमिटेड, डेन्सो किर्लोस्कर इंडस्ट्रीज आणि टोयोटा मटेरियल हँडलिंग यांचा समावेश आहे. मानसी यांना त्याच्या नेतृत्व गुणवत्तेसाठी यंग बिझनेस चॅम्पियन पुरस्कार मिळाला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade