मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

घरघुती गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

आयन फिल लॉन्ड्री सर्विस आयोजित घरघुती गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयन फिल लॉन्ड्री सर्विस आयोजित ऑनलाईन घरघुती गणेश दर्शन स्पर्धा २०२४चा पारितोषिक वितरण सोहळा त्यांच्या मुंबई येथील मुख्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भारतीय संसदेमध्ये मराठी माणसाची भूमिका, गिरणगावातील कामगारवर्गाची बाजू तितक्याच ताकदीने मांडणारे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. ऑनलाईन घरघुती गणेश दर्शन स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर क्षेत्रातून उदंड प्रतिसाद लाभला होता. 

आयन फिल लॉन्ड्री सर्विसचे संचालक उदय पवार यांनी मुंबईसह नजिकच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग यशस्वी करत ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे. दरवर्षी विधायक पद्घतीने गणेशोत्सवाची परंपरा पारंपारिक पद्घतीने जपताना, कलाकारांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार  खासदार अरविंद सावंत यांनी बक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्यांचा आत्मविश्वास वाढवत असताना काढले आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मंचावर कामगार संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश शिरवाडकर, कामगार संघाचे सरचिटणीस तसेच भारतीय कामगार सेनेचे संयुक्त चिटणीस दिलीप जाधव तसेच स्थानिक लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिलीप साटम यांच्यासह आयन फिल लॉन्ड्री सर्विसचे संचालक तसेच युवा उद्योजक उदय अशोक पवार, समाज माध्यम स्पर्धा प्रमुख भरत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रथम पारितोषिक पराग सावंत, द्वितीय पारितोषिक अक्षय चव्हाण, तृतीय पारितोषिक अभिषेक चिटणीस तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक हेरंब जोशी, सिद्धेश साखरकर आणि राकेश पाटील यांना खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.   

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी नेमक्या शब्दांत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करिश्मा सावंत, ज्योती अयरे, वैभव सावंत, अमित बारें,सागर मजरेजर, वैभव पवार. आदींनी परिश्रम घेतले.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट