Breaking News
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून महत्त्वपूर्ण घोषणा
मुंबई -:गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विविध राजकीय पक्षांसह निवडणुकीशी संबंधित झालेल्या चर्चेचा संक्षिप्त तपशील सांगितला. तसेच निवडणुकीची प्रक्रिया विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी पार पाडण्याचे संकेतही दिले. त्यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी सायंकाळी राज्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात या पथकाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर आज विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक तथा इतर भागिदारांशी चर्चा करून त्यांची निवडणुकीसंबंधीची मते जाणून घेतली. त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आपल्या दौऱ्याचा तपशील सादर केला.
राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी माहिती दिली. तसेच, निवडणूक काळात काही निर्बंध घालण्यात येणार असून एटीएमसाठी (ATM) पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचे बंधन असणार आहे. तसेच, याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल, असेही राजीव कुमार यांनी म्हटलं.
राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री 6 ते सकाळीं 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणारं नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाईल.
ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांना स्थानिक वृत्तपत्र आणि चॅनलमध्ये तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, ते सांगावे लागणार आहे. तसेच राजकिय पक्षांनाही हा नियम लागू होणार आहे. त्यांना गुन्हे दाखल असलेल्या नेत्याला उमेदवारी का दिली ते सांगावे लागणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant