Breaking News
44 वर्षांनंतर चीनने केली अण्वस्रवाहू क्षेपणास्राची चाचणी
देश विदेश
बिजिंग - लष्करी विकासासाठी पातळीवर सातत्यानं सतर्क असलेल्या चीनने 44 वर्षांनंतर आपल्या आंतरखंडीय ICBM क्षेपणास्राची चाचणी केली आहे. या क्षेपणास्राचे नाव DF-41 क्षेपणास्र असे असून या क्षेपणास्राने 12 हजार किलोमीटरचे अंतर पार करीत प्रशांत महासागर ओलांडत ऑस्ट्रेलियाजवळील टार्गेट गाठले. हे क्षेपणास्र एकाच वेळी तीन ते आठ टार्गेट हिट होऊ शकते. म्हणजे हे अंतर अमेरिकेइतके आहे. चीन साल मे 1980 नंतर प्रथमच आपल्या इंटर कॉन्टीनेंटल बॅलेस्टीक मिसाईलची ( ICBM ) चाचणी केली आहे.
चीनने या अण्वस्रवाहू क्षेपणास्राची चाचणी करण्यापूर्वी मार्गात येणाऱ्या देशांना कल्पना दिली होती. परंतू त्याच्या मार्गाबद्दल कोणालाही सांगितले नव्हते किंवा टार्गेटबद्दल देखील सांगितले नव्हते. असे म्हटले जाते की या क्षेपणास्राने प्रशांत महासागरातील आपले टार्गेट गाठण्यात यश मिळविले आहे. ही एक प्रकारची एटमॉस्फीरिक टेस्ट होती. म्हणजे हे क्षेपणास्र पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन पुन्हा वातावरणात येण्यात यश आले आहे.
याआधी 1980 मध्ये चीनमध्ये DF-5 हा क्षेपणास्राचे अशाच प्रकारे चाचणी केली होती. त्या क्षेपणास्राने 9000 किलोमीटरचे अंतर गाठले होते. या वेळी DF – 41 ने 12 हजार किलोमीटरचे अंतर कापले आहे. या क्षेपणास्राची ऑपरेशनल रेंज 12 ते 15 हजार किलोमीटर इतकी प्रचंड आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade