मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

देशातील पहिल्या एअर ट्रेनसाठी निविदा जारी

देशातील पहिल्या एअर ट्रेनसाठी निविदा जारी

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील पहिली एअर ट्रेन अर्थात ऑटोमेटेड पीपल मूव्हर (एपीएम) प्रणाली २०२७ पर्यंत सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (डायल) निविदा काढली आहे. अंतर्गत 7.7 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी एअर ट्रेन किंवा एपीएम चालवली जाणार आहे. यात टी २/३, टी १, एरोसिटी आणि कार्गो सिटी असे चार थांबे असतील. ही सुविधा सुरू झाल्याने दोन दूरच्या टर्मिनल्सदरम्यान डीटीसी बसने प्रवास करण्याची गरज राहणार नाही आहे. निविदा निवड प्रक्रियेत निविदाकाराची किंमत आणि महसूल वाटणी मॉडेल किंवा प्रकल्पासाठी आर्थिक मदतीची ऑफर विचारात घेतली जाईल. त्यानंतर हे काम सुरू होणार असून कॅलेंडर वर्ष २०२७ संपण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. डीआयएएलकडून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला ही माहिती देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

निविदा दस्तऐवजात म्हटले आहे की डायलने दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (डीबीएफओटी) मॉडेलवर ग्रेड एपीएम प्रणाली प्रस्तावित केली आहे. एअरोसिटी आणि कार्गो सिटीच्या माध्यमातून सुमारे 7.7 किमी च्या मार्गावर टी 1 आणि टी 3/2 दरम्यान विश्वासार्ह, जलद आणि अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचे एपीएम प्रणालीचे उद्दीष्ट आहे.

टर्मिनल्स दरम्यान आवश्यक कनेक्टिव्हिटी देण्याबरोबरच एपीएम प्रणालीमुळे प्रवाशांची सोय वाढणार आहे. हे एएसक्यू स्कोअर देखील सुधारेल आणि कार्बन फूटप्रिंट कमी करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर ट्रेनची नेमकी किंमत माहित नसली तरी ती दोन हजार कोटीरुपयांपेक्षा कमी असू शकते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट