Breaking News
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच: मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका,
मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगितीच्या विरोधात युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावरुन सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत उद्याच ही निवडणूक घ्या, असे निर्देश दिले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर सुरक्षा व इतर प्रशासकीय यंत्रणांसाठी मुंबई विद्यापीठाने मागितला होता. आता सिनेटची निवडणूक 24 सप्टेंबरला होणार असून 27 सप्टेंबर रोजी निकाल लागणार आहे.
युवासेनेला हायकोर्टाचा मोठा दिलासा
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या युवासेनेला मोठा दिलासा मिळालाय. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत याचिकाकर्ते आणि विद्यापीठ यांच्यात न्यायालयात युक्तीवाद झाला. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे तातडीची सुनावणी पार पडली. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant