Breaking News
मशीद कमिटीने बीएमसीला लिहून दिले आहे, त्याप्रमाणे ते पुढची कारवाई करतील
! धारावीतील मशिद प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
धारावीतील मशिदीच्या संदर्भात माननीय न्यायालयाचाच निर्णय आहे. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात मागच्या वेळेलाही न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार तेव्हाही बीएमसीने कारवाई सुरू केली होती. मात्र, तेव्हा अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल. दरम्यान, आज देखील बीएमसीची टीम त्या ठिकाणी गेली होती. तेव्हा त्यांनी (मशीद कमिटीने) स्वतः सांगितले आहे की पुढील चार-पाच दिवसात आम्ही अतिक्रमण काढतो. त्यामुळे आज टीम परत आली आहे. किंबहूना राज्यात कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न आहे. मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे मशीद कमिटीने बीएमसीला लिहून दिले आहे, त्याप्रमाणे ते पुढची कारवाई करतील, अशी स्पष्टोक्ती देवेंद्र फडणवीस यांनी बोलतांना दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade