मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

बिहारचे ‘सिंघम’ अशी ओळख असणाऱ्या मराठी IPS चा तडकाफडकी राजीनामा

बिहारचे ‘सिंघम’ अशी ओळख असणाऱ्या मराठी IPS चा तडकाफडकी राजीनामा

पटणा -: बिहार केडरचे मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. शिवदीप लांडे यांनी जवळपास १८ वर्ष पोलीस खात्यात सेवा केली आहे. शिवदीप लांडे यांना बिहारमधील सिंघम म्हणून ओळखलं जातं. शिवदीप लांडे यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राजीनाम्याचे नेमके कारण समोर आले नसल्याने ते आता बिहारच्या राजकारणात प्रवेश करणार का अशा चर्चाही रंगत आहेतय

शिवदीप लांडे यांनी याबाबतच्या Facebook पोस्ट मध्ये लिहिले आहे की, “जय हिंद! माझा प्रिय बिहार, गेली १८ वर्षे शासकीय पदावर सेवा दिल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. माझ्या सरकारी नोकरीच्या कार्यकाळात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे. परंतु, मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार माझे कार्यस्थान असेल”, असं शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दोन आठवड्यांपूर्वी लांडे यांनी पूर्णियाच्या IG पदाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर लगेचच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. तिरहुत सारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. राजीनाम्यानंतर बिहारमध्येच राहण्याचा त्यांचा विचार असून विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या तिकिटावर ते पाटणा शहरातून २०२५ ची विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट