Breaking News
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पुणे: राज्याच्या काही भागामध्ये ऑक्टोबर हिटचा (october heat) परिणाम जाणवू लागला आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत आहे. अशातच राज्यात आज आणि उद्या (शनिवार व रविवारी) राज्यातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज (Rain Update) हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
परतीचा मान्सून (Rain Update) उत्तर भारतातून वेगाने पुढे महाराष्ट्रात आला आहे. पंरतू, तो नंदूरबारमध्येच अडखळला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि उकाडा असे वातावरण तयार झाले आहे. शनिवार आणि रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाचा (Rain Update) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याचबरोबर आजपासून (12 ऑक्टोबरपासून) पुढील 5 दिवस म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Rain Update) वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पुन्हा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar