मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

या जपानी संस्थेला जाहीर झाला नोबेल शांतता पुरस्कार

या जपानी संस्थेला जाहीर झाला नोबेल शांतता पुरस्कार

स्वीडन - नोबेल शांतता पुरस्कार 2024 जाहीर झाला असून निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी या संस्थेनं मोठं काम केलंय. अखिल विश्व अण्वस्त्र मुक्त व्हावं, यासाठी ही संस्था जे कार्य करते, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्थेला जाहीर करण्यात आला आहे.

जगात अण्वस्त्रांच्या विरोधात प्रचार केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. या संघटनेत दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अण्वस्त्र हल्ल्यातून वाचलेल्यांचा समावेश आहे. त्यांना हिबाकुशा म्हणतात. हे हिबाकुशा निहोन हिदांक्यो संस्थेच्या माध्यमातून जगभरात त्यांच्या दुःखाच्या आणि वेदनादायक आठवणी शेअर करतात. नोबेल समितीने म्हटले आहे की, एके दिवशी अण्वस्त्र हल्ल्यांना सामोरे गेलेले हे लोक आता आपल्यासोबत नसतील, परंतु जपानची नवीन पिढी त्यांच्या आठवणी आणि अनुभव जगासोबत शेअर करत राहील आणि जगासाठी अण्वस्त्रे किती धोकादायक आहेत याची आठवण करून देईल.

या आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली असून व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. microRNA आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलं आहे.

मानवतेसाठी मोलाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी नोबेल पुरस्कारांनी गौरविण्यात येतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो


रिपोर्टर

संबंधित पोस्ट