Breaking News
अदानी समूह महाराष्ट्राला पुरवणार 6600 मेगावॅट वीज
अर्थ
मुंबई - पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्त्वपूर्ण विकास घडवणाऱ्या अदानी समूहाने महाराष्ट्राला 6600 मेगावॅट सौर ऊर्जा आणि औष्णिक उर्जेचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी बोली जिंकली आहे. कंपनीने यासाठी 4.08 रुपये प्रति युनिट बोली लावली आणि जेएसडब्ल्यू एनर्जी (JSW Energy) आणि टोरेंट पॉवर (Torrent Power) ला मागे टाकले. हा आदेश महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (MSEDCL) जारी केला आहे.
अदानी समूहाची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (Adani Green Energy Limited) 5000 मेगावॅट सौर उर्जेच्या पुरवठ्यासाठी महावितरणसोबत दीर्घकालीन वीज खरेदी करार करेल. लेटर ऑफ इंटेंटनुसार ही वीज गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खवरा येथे विकसित होत असलेल्या रिन्युएबल एनर्जी पार्कमधून महाराष्ट्राला पुरवली जाणार आहे. याशिवाय अदानी समूहाची आणखी एक कंपनी अदानी पॉवर लिमिटेड महाराष्ट्राला 1496 मेगावॅट औष्णिक वीज पुरवठ्यासाठी महावितरणशी दीर्घकालीन करार करणार आहे. अदानी पॉवर त्याच्या नवीन 1600 मेगावॅट अल्ट्रा-सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्पाद्वारे पुरवठा करेल.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 2024-25 साठी सरासरी वीज खरेदी किंमत रुपये 4.97 प्रति युनिट निश्चित केली आहे. अशा प्रकारे, अदानीने लावलेली बोली यापेक्षा सुमारे 1 रुपये प्रति युनिट कमी आहे. 25 वर्षे वीजपुरवठ्याच्या निविदेत एकूण चार कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade