मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ईद-ए-मिलादची मिरवणूक निघणार १६ ऐवजी १८ तारखेला

ईद-ए-मिलादची मिरवणूक निघणार १६ ऐवजी १८ तारखेला

मुंबई - महाराष्ट्र सरकारने मुंबईत ईद-ए-मिलादची अधिकृत सुट्टी १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला जाहीर केली आहे. १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक मुस्लिम समाजाने १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर रोजी ईदची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. स्थानिक जिल्हाधिकारी परिस्थितीनुसार इतर जिल्ह्यांमध्ये ईदच्या सुट्टीचे वेळापत्रक बदलण्याबाबत निर्णय घेऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ईद-ए-मिलादला १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर रोजी येत असून दोन्ही सण धुमधडाक्यात साजरे करता यावेत, यासाठी मुस्लिम समाजाने १८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस १७ सप्टेंबरला आहे. तर, तारखेनुसार, ईद-ए-मिलाद चंद्राच्या स्थितीच्या अधीन राहून १६ सप्टेंबरला साजरा केली जाण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी मुस्लिम समाजाने जातीय सलोखा राखण्यासाठी मिरवणुकीचे वेळापत्रक बदलले आहे.

‘गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मुस्लिम समाजाने स्वेच्छेने आपल्या धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक बदलले आहे. हे समाजातील ऐक्य आणि सहअस्तित्वाचे उल्लेखनीय प्रदर्शन आहे’, असे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे नवी मुंबईतील ईद-ए-मिलादची मिरवणूक तुर्भे येथून सुरू होऊन वाशी आणि कोपरखैरणे मार्गे घणसोली दर्ग्यावर संपते. ईद-ए-मिलाद किंवा ईद-ए-मिलाद-उन-नबी हा दिवस पैगंबर मोहम्मद – इस्लामी धर्माची स्थापना करणारे आदरणीय धार्मिक आणि सामाजिक नेते यांचा जन्म आहे. यावर्षी हा उत्सव चंद्राच्या स्थितीच्या अधीन राहून पारंपारिकपणे १६ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार होता. या उत्सवादरम्यान जगभरातील मुस्लीम बांधव मिरवणुकीत सहभागी होतात.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दरवर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. या वर्षी ७ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात झाली. येत्या १७ सप्टेंबरला अनंत चतुर्थी असेल, या दिवशी सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाईल. याआधी १६ सप्टेंबरला मोठ्या संख्येत गणेशभक्त आपल्या जवळच्या मंडळाला किंवा आपल्या परिसरातील प्रसिद्ध गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट