Breaking News
१७७ दिवसांनंतर केजरीवाल तुरुंगाबाहेर
नवी दिल्ली - मद्य धोरणातील गैरव्यवहारा प्रकरणी गेल्या १७७ दिवसांपासून अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरवींद केजरीवाल यांना आज जामीन मंजूर झाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे ते आत्ता काही वेळापूर्वीच तुरुंगाबाहेर आले आहेत. “माझे मनोबल शंभर पटीने वाढले आहे. माझी ताकद शंभरपटीने वाढली आहे. त्यांच्या तुरुंगाच्या मोठमोठ्या भिंती आणि ते जेल केजरीवालला कमकुवत करु शकत नाही”, अशी प्रतिक्रिया केजरीवालांनी तुरुंगाबाहेर आल्याआल्या दिली आहे.
“मी देवाला प्रार्थना करतो की ज्याप्रमाणे देवाने मला आतापर्यंत मार्ग दाखवला आणि शक्ती दिली, तसाच देव कायम माझ्या पाठीशी राहू दे. मी देशाची सेवा करत राहणार. देशाचा विकास रोखण्यासाठी कितीतरी देशद्रोही शक्ती काम करत आहेत. ते देशाचे विभाजन करण्याचे काम करत आहेत. देशाला आतून कमकुवत करणाऱ्यांविरुद्ध मी आयुष्यभर लढलो आहे आणि यापुढे भविष्यातही लढत राहीन”, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

केजरीवालांना करावे लागणार या अटींचे पालन
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. त्या अटींमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप असलेल्या मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित गुणवत्तेवर भाष्य करणार नाही.
या प्रकरणी सार्वजनिक टिप्पणी करता येणार नाही.
अरविंद केजरीवाल यांना ट्रायल कोर्टासमोर प्रत्येक सुनावणीच्या वेळी हजर राहावे लागेल. मग जोपर्यंत न्यायालय सांगत नाही तोपर्यंत हजर राहावे लागेल.
अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कार्यालयात जाता येणार नाही. सरकारी फाईल्सवर स्वाक्षरीही करता येणार नाही. अगदी आवश्यक असल्यास ते फाईल्सवर स्वाक्षरी करण्यास सक्षम असतील.
जामिनावर बाहेर असताना ते या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांशी संपर्क साधता येणार नाही, अशा महत्वाच्या अटी सर्वोच्च न्यायालयाने घातल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade