मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पंतप्रधान आवास योजनेतून मुंबईतील डबेवाल्यांना मिळणार हक्काचे घर

पंतप्रधान आवास योजनेतून मुंबईतील डबेवाल्यांना मिळणार हक्काचे घर

मुंबई - गेल्या शंभर वर्षांपासून अधिक काळ मुंबईतील गर्दी, पाऊस यांची तमा न बाळगता जेवणाचे डब्बे वेळेवप पोहोचवणाऱ्या मुंबईतील डब्बेवाल्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. राज्य सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून डबेवाल्यांना घर बांधून देण्याची घोषणा केली आहे. डबेवाल्यांसोबतच चर्मकार समाजालाही सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला अवघ्या २५ लाख रुपयांमध्ये मुंबईत ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आमदार श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असो. चे अशोक गायकवाड महाराज आदि उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीसांच्या सभागृहात दिलेल्या आश्वासनानंतर आता पीएम आवास योजनेतून डबेवाल्यांना घरं दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी मुंबईत १२ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. याच्या माध्यमातून डबेबाल्यांना लवकरच मुंबईत हक्काची घरं मिळणार आहेत. मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेने आज देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंज्यस करार करण्यात आला.

मुंबईच्या डबेवाल्यांसोबतच चर्मकार समाजातील लाभार्थ्यांनाही या योजनेत घरं दिली जाणार आहेत. या योजनेसाठी प्रियांका होम्स रियालिटी ३० एकर जागा देणार आहे. तर नमन बिल्डर ना नफा ना तोटा तत्वावर या घरांचं बांधकाम करणार आहे. ५०० चौरस फुटांच्या १२ हजार घरे बांधली जाणार आहेत. येत्या ३ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट