Breaking News
माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन
नवी दिल्ली -ज्येष्ठ माकप नेते सिताराम येच्युरी (७२) यांचे आज निधन झाले. गेल्या महिनाभरापासून सिताराम येच्युरी यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात होते. सिताराम येच्युरी यांनी आयुष्यभर त्यांनी कम्युनिष्ट पक्षाचं काम जोमाने केलं. विशेष म्हणजे भारतात कम्युनिष्ट पक्षाच्या वाढीचा आणि पक्षाला उतरती कळा लागण्याचा काळही येच्युरी यांनी पाहिलेला आहे. सध्याच्या काळाच्या त्यांनी केरळमधील सरकारमध्येही महत्वाची भूमिका बजावली होती. सिताराम येच्युरी यांच्या जाण्याने कम्युनिष्ट पक्षाने बुद्धीवादी चेहरा गमावला आहे.
सीताराम येच्युरी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. सिताराम येच्युरींनी कॉलेज जीवनापासून राजकारणात सहभाग नोंदवत होते. आणिबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दोन्ही सरकारमध्ये ते सत्तेत सहभागी झाले होते.
सीताराम येचुरी यांनी संसदेत कायमच श्रमिकांचे प्रश्न मांडले. कामगार आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांवर त्यांनी कायमच सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. श्रमिकांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमी संसदेत आणि प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढली. संघ परिवार आणि हिंदुत्ववादी विचारसरणीला त्यांनी नेहमी कडाडून विरोध करत आक्रमक भाषणांनी हल्ला चढवला.
सरकारविरोधात धोरणात्मक लढाई त्याचबरोबर उजव्या शक्तींच्या जातीयवादी कार्यक्रमांना रोखताना त्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी न करण्याचे कौशल्य सीताराम येचुरी यांनी खुबीने दाखवले होते. डाव्या आणि लोकशाहीवादी व्यक्तींची एकजूट होणे हे कायमच हिताचे आहे, असे युचेरी सांगत.
सीताराम येचुरी १९८० च्या दशकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सदस्य झाले. २००५ मध्ये पश्चिम बंगालमधून निवडून आल्यानंतर येचुरी पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. १८ ऑगस्ट २०१७ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिले. राज्यसभेत काम करताना त्यांनी देशभरातील अनेक प्रश्न मांडले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर