Breaking News
गणपती आणि सामाजिक संदेश देणारे अनेक देखावे
ई - शहरामध्ये गणपती मंडळांनी विविध विषयांवरील देखावे सादर केले आहेत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी बाहेरगावाहून देखील भाविक येत आहेत. सामाजिक संदेश देणारे अनेक देखावे पहायला मिळत आहेत. ते पाहण्यासाठी लहान-थोर गर्दी करू लागले आहेत. बाजीराव रस्त्यावर अभिनव कला महाविद्यालयापासून वाहनांना बंदी घालण्यात आली असून, मोठी वाहने सोडली जात नाही. जेणेकरून भाविकांना मध्यवर्ती भागातील गणपती पहायला अडथळा येऊ नये. सायंकाळनंतर गणपती पहायला भाविक घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गणरायांचे दर्शन घेतले. त्यासाठी मेट्रोने देखील फेऱ्या रात्रभर सुरू ठेवल्या होत्या. अनेकांनी मेट्रोचा वापर केला आणि गणेश दर्शनाचा आनंद लुटला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे