मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

या तारखेपासून सुरु होणार मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील रेल्वे प्रवास

या तारखेपासून सुरु होणार मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील रेल्वे प्रवास

मुंबई - मेट्रो प्रकल्पामुळे महानगरी मुंबईतील नागरीकांचा दररोजचा प्रवास काहीसा सुखकर झाला आहे. आता मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरे कॉलनी दरम्यानचा रेल्वे प्रवास २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या टप्प्यातील ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे,अशी माहिती मिळाली असल्याचे वॉचडॉग फाऊंडेशनचे अ‍ॅड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. वॉचडॉग फाऊंडेशनचे अ‍ॅड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे मेट्रो-३ च्या वस्तुस्थितीबाबत माहिती अर्ज दाखल केला होता. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

राज्यात होणार्‍या आगामी निवडणुकांसाठी लागणार्‍या आचारसंहितेआधी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ चा काही टप्पा सुरू करण्याचा महायुती सरकारचा विचार सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील रेल्वे प्रवास सप्टेंबरमध्येच सुरू होणार आहे.या प्रकल्पाचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे.तर दुसर्‍या टप्प्यातील बीकेसी ते कफ परेड दरम्यानचा पुढील टप्पा फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू होईल,अशी माहिती अ‍ॅड.गॉडफ्रे पिमेंटा यांच्या माहिती अर्जाच्या उत्तरात देण्यात आली आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट