मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

Vistara Airline चे टाटा कंपनीमध्ये होणार विलिनीकरण

Vistara Airline चे टाटा कंपनीमध्ये होणार विलिनीकरण

मुंबई - सिंगापूर एअरलाइन्सला विस्ताराचे एअर इंडियामध्ये प्रस्तावित विलीनीकरणाचा भाग म्हणून थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) भारत सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. सिंगापूर एअरलाइन्स टाटा समूहासोबत संयुक्तपणे विस्तारा चालवते. या मान्यतेमुळे या वर्षाच्या अखेरीस विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये 25.1 टक्के हिस्सा मिळेल. या करारानंतर एअर इंडिया जगातील सर्वात मोठ्या एअरलाइन समूहांपैकी एक होईल.

विमान कंपनी विस्ताराचे प्रवासी 3 सप्टेंबरनंतर प्रवासी तिकिट बुकिंग करू शकणार नाहीत. विस्ताराने सांगितले की, आता प्रवासी 3 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर 2024 किंवा त्यानंतरच्या प्रवासासाठी विस्तारासोबत बुकिंग करू शकणार नाहीत. विस्तारा विमानांचा एअर इंडियाच्या कामकाजात समावेश केला जाईल आणि सध्या चालवल्या जाणाऱ्या मार्गांचे बुकिंग एअर इंडियाच्या वेबसाइटवर केले जाईल. विस्तारा 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत बुकिंग घेणे आणि फ्लाइट चालवणे सुरू ठेवेल. विस्ताराची सर्व विमाने 11 नोव्हेंबरनंतर एअर इंडियाद्वारे चालवली जातील. विस्तारा फ्लाइटचे फ्लाइट क्रमांक देखील 12 नोव्हेंबर 2024 रोजी किंवा त्यानंतर एअर इंडिया कोडमध्ये बदलतील.

या प्रस्तावित विलीनीकरणाची घोषणा नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आली. एअर इंडिया टाटा समूहाच्या मालकीची आहे. तर विस्तारा ही टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्समधील 51:49 चा संयुक्त उपक्रम आहे. सध्या टाटा समूहाचा विस्तारामध्ये 51 टक्के आणि सिंगापूर एअरलाइन्सचा 49 टक्के हिस्सा आहे.सिंगापूर एअरलाइन्सने एअर इंडियामध्ये विस्ताराचे प्रस्तावित विलीनीकरणाचा एक भाग म्हणून थेट विदेशी गुंतवणुकीसाठी भारत सरकारकडून मंजुरी मिळवली आहे, असे सिंगापूर एअरलाइन्सने शुक्रवारी सिंगापूर शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट