मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडणे उत्सवाचे आयोजन

नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडणे उत्सवाचे आयोजन 

मुंबई - सोमवार, दि. 19 ऑगस्ट रोजी लालबाग परळ भोईवाडा येथे नारळी पौर्णिमा व रक्षा बंधन सणानिमित्त कोळी बांधवांच्या जुन्या रूढी परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी खापरीदेव सेवा संस्थेतर्फे भव्य नारळ फोडणे उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला  परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्सवात हातात नारळ घेवून, दुसऱयाच्या हातील नारळावर आपटून नारळ फोडवा लागतो. ज्याने जास्त नारळ फोडले तो विजयी घोषित केला जातो. याप्रसंगी स्वाराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष व सा. आदर्श स्वाराज्यचे संपादक- उदय पवार उपस्थित होवून या स्पर्धेचा आनंद घेतला. या स्पर्धेमुळे जुन्या व परंपरेला नवा उजाळा देत नागरिकांमध्ये नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त एकतेचा संदेश देण्यात आला. या उत्सवासाठी संस्थेचे अध्यक्ष अंकुश भुर्के, उपाध्यक्ष- दिपक हेमण, संतोष शिर्के, अजित पडेलकर, सरचिटणीस - नाना शिगवण, सहचिटणीस - चंद्रकांत आंबेडे, नामदेव हेलांडे, सुधीर लिमजे, सुनिल दिवाळे, खजिनदार-संतोष हेमण, सहखजिनदार - अंकुश धावडे, निखिल खताते, विश्वनाथ बैकर, प्रभाकर राणे आदी पदाधिकाऱयांनी अथक परिश्रम घेतले. 

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट