मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

"प्राइड ऑफ इंडिया- आयकॉन पुरस्कार खासदार अरविंद सावंत यांना प्रदान

हेराल्ड ग्लोबल जागतिक संस्थेचा प्रतिष्ठेचा"प्राइड ऑफ इंडिया- आयकॉन पुरस्कार खासदार अरविंद सावंत यांना प्रदान

मुंबई दि.२१:हेराल्ड ग्लोबल आणि  ईआरटीसी मीडिया चा प्राइड ऑफ इंडिया - आयकॉन 2024" हा पुरस्कार (ठाकरे गटाचे) खासदार अरविंद सावंत यांना प्रदान करण्यात आला. 

भारताच्या अभिमानाला मूर्त रूप देणाऱ्या प्रतिष्ठित नेत्यांना  हा पूरस्कार देण्यात येतो.खासदार  म्हणून अभिमानास्पद कामगिरी,कर्तव्यदक्ष, वचनबद्धता, दूरदर्शी नेतृत्व, महत्त्वपूर्ण योगदान, भारताच्या समृद्ध वारसाचे प्रतिबिंब आणि अर्थव्यवस्थेवरील परिवर्तनात्मक प्रभाव अशा विविध बाबींची दखल घेऊन सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे कार्य करण्याची प्रेरणा, ऊर्जा आणि संधी दिल्याबद्दल आदरणीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा मी शतशः ऋणी आहे,असे पुरस्कार स्वाकारतांना अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. काल आयटीसी मराठा येथे हा सोहळा संपन्न झाला.         

सदर सोहळ्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर अध्यक्ष श्री. ललित गांधी, बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर यांनाही सन्मानित करण्यात आले.

  चित्रपट , उद्योग , संगीत क्षेत्रातील  यशस्वी  प्रतिभावंतांचा त्यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी ईआरटीसी मीडियाचे प्रतिनिधी, समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारे गुणवंत उपस्थित होते.हेराल्ड ग्लोबल संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतास थायलंड, दुबई, मलेशिया, सिंगापूर, लंडन आदी देशांत अनेक यशस्वी कार्यक्रम केले आहेत. या सोहळ्यात भारतातील यशस्वी ब्रँड्स आणि विविध क्षेत्रातील यशस्वी नेत्यांची ओळख करून देणार्‍या कॉफी टेबल बुकच्या 16 व्या आवृत्तीचे  16th edition) प्रकाशन देखील करण्यात आले


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट