Breaking News
राणीबाग प्राणी संग्रहालयाच्या तिकिटावर इंग्रजी भाषेचा वापर
....अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने तीव्र आंदोलनचा इशारा
आपल्या मुंबईला वैभव प्राप्त असलेले वीर जितामाता उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेश तिकिटावर मराठी भाषा डावलून इंग्रजी भाषेचा वापर करण्यात येत आहे ही बाब मनसेला समजताच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री.बाळा नांदगावकर साहेब व सरचिटणीस श्री.संजय नाईक साहेब यांच्या आदेशाने तसेच भायखळा विधानसभा विभाग अध्यक्ष जगदीश राऊत म. विभाग अध्यक्षा सौ.शलाका हरायाण, शाखाध्यक्ष किरण शंकर टाकळे आदी मनसे पदाधिकारी यांनी उद्यान अधीक्षक श्री.डॉ त्रिपाठी साहेब यांना उद्यान प्रवेश तिकिटावर लवकरात लवकर मराठी भाषेचा वापर करावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देत इशारा दिला.
यावेळी भायखळा विधानसभेतील आजी माजी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant