मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

धैर्यशील पाटील यांनी केला अर्ज दाखल

धैर्यशील पाटील यांनी केला अर्ज दाखल

मुंबई - राज्यसभेसाठी आज भाजपाच्या वतीने माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते भरत गोगावले आदी उपस्थित होते.

राज्यसभेसाठी महायुतीकडून धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर

Rajya sabha Election : राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील दोन जागांसह नऊ राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त १२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येत आहेत. त्यानुसार भाजपने रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील (Darhysheel patil) यांना तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून साताऱ्यातून नितीन पाटील (nitin patil) यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या बुधवारी नितीन पाटील राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीकडून दोन्ही जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न असणार आहे.

भाजपने धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची  उमेदवारी जाहीर केली आहे.  गेल्याच वर्षी शेतकरी कामगार पक्षाचे नेते धैर्यशील पाटील भाजपमध्ये सामील झाले होते. आता दुसऱ्याच वर्षी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. भाजपाने राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आसामधून मिशनरंजन दास, रामेश्वर तेली. बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिसा येथून ममता मेहंता, राजस्थान मधून सरदार रवनीत सिंह बिट्टू, त्रिपुरा येथून राजीब भट्टाचार्जी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर या दोन जागांवर कोण लढणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. भाजपाचे नेते  पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन्ही जागांवर भाजपा आपले उमेदवार देणार की त्यापैकी एक जागा मित्रपक्षाला देणार, याबाबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता भाजपाने यादी जाहीर करत एकाच जागेवर उमेदवार जाहीर करत एक जागा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सोडली आहे. भाजपकडून रायगडच्या धैर्यशील पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट