Breaking News
मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर
मुंबई - आज आपल्या रोजच्या जगण्यातील प्रत्येक क्षेत्र AI ने प्रभावित झाले आहे. विविध उद्योग समूह आपल्या कामात AI चा अवलंब करून नावीन्यपूर्ण उपक्रम करू लागले आहेत. मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर ZEENIA महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. झी 24 ही वृत्तवाहिनी हा विक्रम करणार आहे. पुन्हा इतिहास रचला आहे. आज ( 16 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजल्यापासून हा AI सर्व्हे झी 24 तासवर पाहाता येणार आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार याचा अंदाज या पहिल्या AI सर्व्हेतून घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक दोन महिन्यांवर आली असताना झी 24 तासनं विधानसभेचा सर्वात मोठा AI सर्व्हे केला आहे. पहिली मराठी AI अँकर ZEENIA हा सर्व्हे जाहीर करणार आहे. या सर्व्हेत आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला आहे. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व्हे तयार केला आहे. राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकला आहे. यांचा अंदाज घेण्यात आला आहे.
मतदारांच्या मनातील प्रश्नांच्या आधारे हा सर्व्हे तयार करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय चित्र बदललं? महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोणाचं राज्य येणार? लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरणार? मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती मिळणार? विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा असणार का? महाराष्ट्रात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार? हे आणि महाराष्ट्रातील मतदारांशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर हा सर्व्हे तयार करण्यात आला आहे.
Zee मीडियाच्या या AI Anchor चा प्रयोग प्रेक्षकांना आवडल्यास येत्या काळात माध्यमक्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाचा मोठा अवलंब होऊ शकतो. मात्र यामुळे माध्यमक्षेत्रातील कार्यरत लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार का? या प्रश्नाचे उत्तर येत्या काळातच मिळेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant