Breaking News
जेविनने जोविनला चकविले
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना जेविन पलायुरने (४.५ गुण) सरस सरासरीच्या बळावर त्याचाच भाऊ जोविन पलायुरला (४.५ गुण) चकविले. चौथ्या साखळी फेरीपर्यंत अपराजितपणे संयुक्त आघाडी गाठणाऱ्या दोघा भावांनी पाचव्या निर्णायक फेरीत चुरशीचा खेळ केला. प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करणाऱ्या डावपेचांची आतषबाजी अखेर ४.५ साखळी गुणांच्या बरोबरीत संपली. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्यीत स्पर्धेमधील विविध वयोगटाचे विजेतेपद मुलांमध्ये जेविन पलायुर, अनय भांगरे, अगस्त्य गुरव, राघव संचेती आणि मुलींमध्ये जीयाना धरमसी, सिम्रिता बुबना, मृणमयी डावरे, प्रकृठी एस. यांनी जिंकले. मुंबई शहर व उपनगर, ठाणे व पालघरमधील १५८ सबज्युनियर बुध्दिबळपटूनी स्पर्धेत रंगत आणली. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग सौजन्याने एकूण १२० विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
१४ वर्षाखालील मुलांमध्ये जेविन पलायुरने (४.५ गुण) प्रथम, जोविन पलायुरने (४.५ गुण) द्वितीय, अमोघ त्रिपाठीने (४ गण) तृतीय तर मुलींमध्ये जीयाना धरमसीने (३.५ गुण) प्रथम, मैत्रेयी बेराने (३ गुण) द्वितीय, पुण्या कुमारने (३ गुण) तृतीय; ११ वर्षाखालील मुलांमध्ये अनय भांगरेने (४ गुण) प्रथम, दीप फुणगेने (४ गुण) द्वितीय, योहान्न जैनने (४ गुण) तृतीय तर मुलींमध्ये सिम्रिता बुबनाने (३ गुण) प्रथम, अरीहा देवरुखकरने (२ गुण) द्वितीय, शरण्या साळवीने (२ गुण) तृतीय; ९ वर्षाखालील मुलांमध्ये अगस्त्य गुरवने (४ गुण) प्रथम, शिवांश गिरीने (४ गुण) द्वितीय, अयान पुणेकरने (३.५ गुण) तृतीय तर मुलींमध्ये मृणमयी डावरेने (५ गुण) प्रथम, साराह जेकबने (३.५ गुण) द्वितीय, नित्या बंगने (३ गुण) तृतीय आणि ७ वर्षाखालील मुलांमध्ये राघव संचेतीने (४.५ गुण) प्रथम, वेदांत चिदंबरमने (४ गुण) द्वितीय, आर्शिव गोयलने (४ गुण) तृतीय तर मुलींमध्ये प्रकृठी एस.ने (३.५ गुण) प्रथम, मायरा झुनझुनवालाने (३.५ गुण) द्वितीय, कैरा दोशीने (३ गुण) तृतीय क्रमांक मिळविला. महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव पी.बी. भिलारे, बुध्दिबळ प्रशिक्षक नेव्हिल अल्वारीस, क्रीडाप्रेमी उदय पवार, सल्लागार नामदेव घाग, क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
***********************
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant