Breaking News
विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम शिक्षण आत्मसाथ करावे.
विद्यार्थी हा शाळेत, शालेय अभ्यासातुन चांगले शिक्षण, तर घरात चांगल्या विचारांचे संस्कार घेऊ शकतो. नियमीत भरपूर वाचन करावे. चांगले ज्ञान संपादन करुन विद्यिर्थ्यांनी आपली शैक्षणिक व औद्योगिक प्रगती साधली पाहिजे. समाज झपाट्याने पुढे जात आहे. त्यामुळे, आजच्या विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम शिक्षण आत्मसाथ करावे. असे मार्गदर्शन मुंबई विद्यापिठाचे प्राध्यापक, हेमंत सामंत यांनी मुंबई दादर येथे नाभिक बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी केले.
सिंधुदुर्गातील नाभिक विद्यार्थ्यांचा, गुणगौरव कार्यक्रम दादर मुंबई येथे, संघटणेचे अध्यक्ष अरुण चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली व मुंबई सलुन असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष व संघटणेचे मार्गदर्शक दत्तात्रय चव्हाण यांचे उपस्थितीत ३ ऑगष्ट रोजी संपन्न झाला. यावेळी
बोलताना प्रा. हेमंत सामंत म्हणाले नाभिक समाजाला फार मोठे महत्व आहे. समाजाच्या हातात जन्मापासूनच कायमचा व्यवसाय असल्याने नाभिक समाज कधी गरीब राहाणार नाही. परंतु एकोपा व एकजुट महत्वाची आहे. मुंबईतील नाभिक समाजाला एकत्र करण्याचे मोठे कार्य गावी राहुन सुध्दा पत्रकार गणेश चव्हाण करत आहेत. ही मोठी अभिमानाची बाब आहे. या संघटणेत तुम्ही सर्वांनी गणेश चव्हाण यांच्या संपर्कात रहा. एक फार मोठी क्रांती घडु शकते.
संघठणेचे अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी मुंबईतील समाजाने एकत्र यावे. व समाजाचे हित साधावे असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पत्रकार गणेश चव्हाण रा. श्रावण यांच्या नाभिक संघठण या संकल्पनेतुन स्थापन झालेल्या, या संघटणेच्या वतीने मुंबईतील नाभिकांच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम हाती घेतले असल्याने, गणेश चव्हाण यांचा फेठा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन, संघटणेचे कार्याध्यक्ष व स्टेट बॅंकेचे निवृत्त अधिकारी आनंद चव्हाण यांचे हस्ते सत्कार केला.
यावेळी, मुंबई दादर सारख्या ठिकाणी, श्री संत सेना, स्मारक मंडळाने, नाभिक समाजासाठी अनेक वर्ष, विविध उपक्रम राबवल्याबद्दल, संत सेना स्मारक मंडळाचे अध्यक्ष विलास चव्हाण व खजिणदार शरद पवार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
श्री संतसेना महाराज स्मारक मंडळ, दादरचे अध्यक्ष विलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. तर नाभिक बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
खजिणदार शरद पवार यांनी मार्गदर्शन करत मंडळाकडुन ३० ऑगष्ट रोजी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन करत, सिंधुदुर्गातील नाभिक समाजाच्या भवनासाठी, संतसेना स्मारक मंडळाकडुन २५ हजार रुपये देण्याचे जाहीर केले.
मुंबई सलुन असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ मार्गदर्शक दत्तात्र्यय चव्हाण (तरेळे), चित्रपट निर्माते व महाराष्ट्र सलून असोशिएशन माजी अध्यक्ष दिपक यादव, महाराष्ट्र सलून असोशिएशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, मालाड तानाजीनगर येथिल तरेळेचे नाभिक सुपुत्र समाजसेवक नामदेव चव्हाण, संघठणेचे संस्थापक पत्रकार गणेश चव्हाण, जेष्ठ समाजसेवक जनार्दन चव्हाण, उपाध्यक्षा सौ. सोनाली चव्हाण यांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला, संतसेना स्मारक मंडळाचे संचालक अनंत चव्हाण, संघठणेचे कार्याध्यक्ष आनंद चव्हाण, खजिणदार महादेव (दाजी) चव्हाण, सचिव हेमंत वालावलकर, समाजसेवक चंद्रशेखर सावंत, कृष्णा कारुडकर, संतोष कदम, भालचंद्र वेंगुर्लेकर, विजय कदम, सौ. संगिता चव्हाण सुरेंद्र चव्हाण, प्रसाद चव्हाण उमेश वालावलकर, तसेच नाभिक बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश चव्हाण यांनी केले तर आभार हेमंत वालावलकर यांनी मानले. गुणगौरव कार्यक्रम व नाभिक संघठणसाठी मुंबईतील सर्व बांधवानी, मोठी मेहनत घेतली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade