मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

‘जय संतोषी माँ’ चित्रपटाच्या निर्मात्याचे निधन

‘जय संतोषी माँ’ चित्रपटाच्या निर्मात्याचे निधन

मुंबई - हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सतराम रोहरा (८५) यांचे निधन झाले आहे. ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटासाठी सतराम हे विशेष ओळखले जायचे. ‘जय संतोषी माँ’ने थिएटरमध्ये असा विक्रम केला जो आजपर्यंत कोणताही चित्रपट करू शकला नाही. ‘जय संतोषी मां’चे बजेट फक्त 5 लाख रुपये होते, पण त्यावेळी जवळपास 5 कोटी रुपये कमावले होते, जे आजच्या तुलनेत 100 पट जास्त आहे. जय संतोषी माँ’ हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले, जे मोडणे आजही कठीण झाले आहे. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ‘शोले’ या चित्रपटाला देखील टक्कर दिली होती. चित्रपटात माँ संतोषीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनिता गुहा यांची खऱ्या आयुष्यातही लोक पूजा करत.

सतराम रोहरा यांचा जन्म १६ जून १९३९ रोजी सिंध, ब्रिटिश भारतात म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये झाला. स्वातंत्र्यानंतर सतराम यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. यानंतर सतराम यांनी येथूनच आपले शिक्षण पूर्ण केले. निर्माता म्हणून सतराम रोहरा यांचा पहिला चित्रपट म्हणजे १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शेरा डाकू.’ यानंतर त्याचा ‘रॉकी मेरा नाम’ हा चित्रपट आला जो सुपरहिट ठरला. यातूनच त्यांची कारकीर्द पुढे आली. यानंतर त्यांनी ‘जय संतोषी मां’ हा चित्रपट बनवला, जो ब्लॉकबस्टर ठरला.

याशिवाय जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे ‘नवाब साहिब’, ‘घर की लाज’, ‘करण’ आणि ‘जय काली’ असे अनेक सिनेमे सतराम यांनी केले होते. सतराम रोहरा हे निर्माते तसेच गायक होते. ‘झुलेलाल’, ‘हाल ता भाजी हालू’, ‘शाल ध्यार ना जमान’ आणि ‘लाडली’ ही गाणी त्यांनी गायली आहेत.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट