स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या’ प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत दिल्लीसह बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक तसेच प्रकाशकांना ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारासाठी’ महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार आहे.
मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजने’ अंतर्गत विविध साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. प्रकाशन वर्ष २०२१ करिता दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके आणि प्रवेशिका या स्पर्धेसाठी दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पाठविता येणार आहे.
*एकूण ४ विभाग, ३५ साहित्य प्रकार आणि २९ लाख रूपयांचे पुरस्कार*
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार विभागात ३५ साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्.मय विभागात काव्यासाठी ‘कवी केशवसुत पुरस्कार’ (१ लाख रूपये), कादंबरीसाठी ‘हरी नारायण आपटे पुरस्कार’ (१ लाख रूपये) अशा एकूण २२ साहित्य प्रकारात प्रत्येकी १ लाख रुपये या प्रमाणे एकूण २२ लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.
बाल वाड्.मय विभागात कवितेसाठी ‘बालकवी पुरस्कार’ (५० हजार रूपये), कादंबरीसाठी ‘सानेगुरूजी पुरस्कार’ (५० हजार रूपये) अशा एकूण ६ साहित्य प्रकारात प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे एकूण ३ लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.
प्रथम प्रकाशन प्रकारात काव्यासाठी ‘बहिणाबाई चौधरी पुरस्कार’ (५० हजार रूपये), नाटक एकांकिकेसाठी ‘विजय तेंडुलकर पुरस्कार’ (५० हजार रूपये) अशा एकूण ६ साहित्य प्रकारात प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे एकूण ३ लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.
‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृहन्महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या श्रेणीत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार’ (१ लाख रूपये) प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली येथे पाठविता येणार आहेत.
या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दूसरा मजला, सयानी रोड, प्रभा देवी, मुंबई-४०० ०२५ यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच, बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/८, स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबाखडक सिंह मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयातही स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका उपलब्ध आहे. याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०२१ नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.
बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील विजेत्यांसाठी ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ (सर्व साहित्य) साठी निवड केली जाईल. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.
ज्या लेखक व प्रकाशकांना या योजनेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी (मुंबईतील लेखक /प्रकाशकांनी) पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमून्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ येथे पाठवाव्यात. मुंबई वगळता राज्यातील अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांनी थेट महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मुख्य कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली या कार्यालयाकडे हे साहित्य व प्रवेशिका दिनांक १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. पुरस्कारासाठीची प्रवेशिका व नियमावली या कार्यालयास प्राप्त झाली असून इच्छुकांना पाहण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी या कार्यालयात उपलब्ध आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर