Breaking News
पनवेल ः मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून एमकेसीएलतर्फे पत्रकारांसाठी ‘आयटीत मराठी- ऐटीत मराठी’ विनामूल्य कार्यशाळा नवीन पनवेल येथील शाहू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पार पडली. शाहू इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक व एमकेसीलचे कोकण प्रमुख जयंत भगत यांच्या संकल्पनेतून हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचा पनवेल व नवी मुंबईतील 30 हुन अधिक पत्रकारांनी लाभ घेतला.
या कार्यशाळेत टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश लिहिणे, मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे, जुन्या मराठी पानांच्या फोटो वरून त्याचे टेक्स्ट मिळविणे, मराठीतून टाईप करणे, ऑनलाईन अर्ज भरणे, मराठी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचणे, सोशल मिडियावर मराठी वापरणे असे उपयुक्त अनेक प्रात्यक्षिके तज्ज्ञांच्या मार्फत सादर करण्यात आली .
ज्ञानाची देवाण-घेवाण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेतून व्हावी, तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपयंत मराठी भाषेतून उपलब्ध व्हावे, या करिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित प्रयत्नशील आहे. त्यासाठी मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून चघउङतफे ‘आयटीत मराठी- ऐटीत मराठी’ ही दोन तासांची विनामूल्य कार्यशाळा 24 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2020 दरम्यान आयोजित केली आहे. जागजागतिकीकरणाच्या या जमान्यात मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी, समृद्धीसाठी, अस्मितेसाठी, आणि उन्नतीसाठी योजिलेला हा उपक्रम सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त आहे.
टँली, डीटीपी, वेब डिजाईन, सी प्लस प्लस, ग्राफिक डिजाईन, अड्वान्स एक्सेल मराठी भाषकांसाठी विविध उपयुक्त अॅप्स , शब्दकोश, इ. विविध आयटी सुविधा व टूल्स आपण मराठी भाषेतून वापरली तरच जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा जगात ऐटीत राहू शकेल म्हणून जर ‘आयटीत मराठी (तरच) ऐटीत मराठी’! ही कार्यशाळा महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर सर्वदूर उपलब्ध असलेल्या 5000 हून अधिक चड-उखढ केंद्रावर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. त्याचा मराठी राजभाषादिनानिमित्त जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन जयंत भगत यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya