Breaking News
स्पर्धा परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी
मुंबई - राज्यातील सारथी , बार्टी , महाज्योती आणि टीआरटीआय या संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिकवणी संस्था गैरव्यवहार करत असतील तर त्याची चौकशी केली जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
या स्वायत्त संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यासाठी निविदा मिळवण्यासाठी मंत्रालयात आणि अधिकाऱ्यांना तसंच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना तसंच प्रवेशासाठी देखील उमेदवारांना आमिष दाखवले जात असल्याचं सांगत भाजपाचे निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला , यावर उच्चस्तरीय प्रशासकीय समिती नेमण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
या प्रशिक्षण कालावधीवर मर्यादा घालण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं शिरसाट यांनी सांगितलं. या प्रशिक्षणासाठी राज्यभरात १७६ संस्था संलग्न असून राज्य सरकारकडून या प्रशिक्षणासाठी प्रत्येक उमेदवार ३५ ते ४० हजार महिन्याला खर्च केला जातो त्याचा अहवालही दिला जातो ,मात्र काही उमेदवार अनेक काळ प्रशिक्षण घेत राहतात ,अन्य उमेदवारांना संधी मिळायला हवी असं शिरसाट यांनी सांगितलं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar