Breaking News
ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : आगरी बोलीतील कवितांची गोडी कल्याणकरांना अनुभवता आली. निमित्त होते अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित सलग पन्नास तासांचा अखंड वाचन यज्ञ हा कार्यक्रम. यावेळी आगरी कवींनी विविध आशयाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
आगरी कवितांचा हा कार्यक्रम तीन सत्रात घेण्यात आला. यात कविता, चारोळ्या, पारंपारिक गीते, लग्न गीते, धवला असे आगरी साहित्यातले विविध प्रकार हाताळण्यात आले. या कवी संमेलनात कवितांना पार्श्वसंगीत देण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. यासाठी संगीत संयोजक 'आपला बंड्या' यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा. एल. बी. पाटील, प्रसिद्ध साहित्यिक अनंत शिसवे, प्रसिद्ध साहित्यिक कैलास पिंगळे या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या संपूर्ण पन्नास तासांच्या सत्रात कविता वाचन, कथाकथन, अभिवाचन असे सत्र सुरु होते.
ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आयोजन अक्षर साहित्य मंचचे अध्यक्ष योगेश जोशी, उपक्रम समन्वयक हेमंत नेहते, उपक्रम प्रमुख सुश्रुत वैद्य यांनी केले होते. तसेच आगरी बोली कट्टा या कवी संमेलनाचे खुमासदार निवेदन प्रसिद्ध कवी रामनाथ म्हात्रे तसेच श्याम माळी यांनी केले. आगरी बोली कट्टाच्या समन्वयकाची जबाबदारी प्रसिद्ध कवी संदेश भोईर यांनी उत्कृष्ट नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडली.
दरम्यान यावेळी प्रसिद्ध आगरी कवी जयंत पाटील यांच्या दुसऱ्या 'चिंकोरा' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात अनुक्रमे प्रसिध्द गायिका संगीता पाटील, दया नाईक, प.सा.म्हात्रे, स्नेहाराणी गायकवाड, डॉ. शोभा पाटील, अश्विनी म्हात्रे ,अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे, सुनील पाटील सर, अरुण पाटील, निलेश घोडे, हरिश्चंद्र दळवी, विनोद कोळी, रवींद्र भांडे, नीतुराज पाटील, सुनील पाटील (सच्चा माणूस), संतोष जाधव, माधव गुरव, शीतल कटारे, जयराम कराळे, जयंत पाटील, गिरीश म्हात्रे, नवनाथ ठाकूर, जय म्हात्रे, अनंत भोईर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तनू स्टुडिओचे मालक जोगेंद्र जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर