मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शिव उद्योग संघटनेचा महिला सबलीकरणासाठी पुढाकार


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेने महिला सक्षमीकरण धोरणांतर्गत एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील महिलांना आर्थिक लाभ होणार आहे.


शिव उद्योग संघटनेने 'इंदिश्रेष्ठ शास्त्रम् आयुर्वेदिक हेअर ऑईल' आणि 'स्टे फाईन मल्टि व्हेंचर' या दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. या करारांतर्गत घरोघरी तसेच समाज माध्यमांद्वारे विक्रीतून महिलांना आर्थिक लाभ होणार आहे.


शिव उद्योग संघटनेच्या महिला रोजगार समिती व मार्केटिंग समिती या दोन्ही समित्या हा उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अतिशय उत्तम प्रकारे आर्थिक फायदा होणार असून या उपक्रमात काम करण्याची इच्छा असेल तर कृपया 9702058930 या संपर्क क्रमांकावर व्हॉटस्ॲप द्वारे आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक पाठवावा. शिव उद्योग संघटनेच्या मार्केटिंग समितीचे सदस्य आपणास या विषयाची पूर्ण माहिती देतील.


सदर उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आणि शिव उद्योग संघटनेच्या महिला रोजगार समिती, मार्केटिंग समितीचे सदस्य आणि विविध जिल्ह्यातील पदाधिकारी या उपक्रमाच्या यशासाठी कठोर परिश्रम करत आहेत.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट