Breaking News
हा देश पंतप्रधान मोदींना देणार सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान
नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात जगभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती असताना भारताने अनेक देशांना वेळेवर लस पुरवठा करून मोठे कार्य केले आहे. भारत सरकारच्या या विशेष प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेने देखील घेतली आहे. जगभरातील अनेक देश आज चार वर्षांनंतरही या कोरोनातील मदतीसाठी मोदी सरकारचे आभार मानतात. डोमेनिका सरकारने आता भारत सरकारच्या या कामाचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान मोदींना देण्याचे ठरवले आहे.
डॉमिनिका सरकारने म्हटले की, कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिका या महिन्यात पंतप्रधान मोदींना आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ प्रदान करणार आहे. कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकामध्ये मोदींचे योगदान आणि दोन्ही देशांमधील भागीदारी मजबूत करण्याच्या त्यांच्या समर्पणाची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जाणार आहे.
डॉमिनिकाच्या कॉमनवेल्थच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जॉर्जटाउन, गयाना येथे होणाऱ्या आगामी भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत हा पुरस्कार प्रदान करतील, असे डॉमिनिकन पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar