मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

या कंपन्यांनी लाँच केली रेडी-टू-ड्रिंक दारू

या कंपन्यांनी लाँच केली रेडी-टू-ड्रिंक दारू

मुंबई - दारू पिणे आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जाते. मात्र काही अपवाद वगळता शासनाकडून मद्य विक्री आणि सेवनावर कायदेशीर बंदी नाही. मद्यविक्रीमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो त्यामुळे जगभर बहुतांश ठिकाणी मद्यपान केले जाते. मद्य पिताना त्यात योग्य प्रमाणात मिक्सिंग करणे ही एक कला मानली जाते. उत्तम प्रकारे मिक्सिंग करून देणाऱ्या व्यक्तीला हॉटेल आणि हॉस्पीटॅलिटी क्षेत्रात करिअरची चांगली संधी उपलब्ध असते. मात्र अशा प्रकारे योग्य प्रमाणात पेग बनवणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे मद्यप्रेमींची ही अडचण लक्षात घेऊन आता बाजारात रेडी टू ड्रिंक मिक्स केलेली दारू दाखल झाली आहे. ॲब्सोलट वोडका आणि स्प्राइटने एक डायनॅमिक फ्यूजन बाजारात आणलं आहे. हे दोन प्रकारांमध्ये येतं ज्यामध्ये नियमित स्प्राईट आणि स्प्राईट झिरो शुगर स्पाइट मिक्स केलेलं असेल. अल्कोहोल बेव्हरेज व्हॉल्यूम (ABV) साठी जागतिक बेंचमार्क सुमारे 5% असेल, परंतू तो बाजारानुसार बदलू शकतो. म्हणजेच या ड्रिंकमध्ये सर्वसामान्यता 5 टक्के अल्कोहोल असेल.

हे ड्रिंक भारतीय बाजारात अजून लाँच झालेलं नाही, पण ते युनायटेड किंगडम, नेदरलँड्स, स्पेन आणि जर्मनीसह निवडक युरोपियन देशांमध्ये लॉन्च झालं आहे. भारतात ते कधी आणलं जाईल याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Absolut आणि Sprite रेडी-टू-ड्रिंकच्या आयकॉनिक पॅकेजिंगमध्ये जगातील दोन प्रसिद्ध ट्रेडमार्क आहेत: Absolut, प्रीमियम व्होडकाचे आंतरराष्ट्रीय प्रतीक, स्वीडनमध्ये 1879 मध्ये जन्मलेले आणि उत्कृष्ट स्वीडिश गहू आणि स्प्राइट.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट