Breaking News
नेरळ – माथेरान मिनी ट्रेन तब्बल ५ महिन्यानंतर पुन्हा सुरू…
कर्जत - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हिल स्टेशन असणाऱ्या माथेरानचे आकर्षण आणि माथेरानचा आर्थिक कणा असलेली नेरळ – माथेरान मिनी ट्रेन आजपासून पुन्हा रुळावर आली आहे. तब्बल पाच महिन्यांनी माथेरानची राणी पुन्हा माथेरानकरांच्या भेटीला आली असल्याने राणीच्या स्वागताला नेरळ आणि माथेरानकर सज्ज झाले होते.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हिल स्टेशन असणाऱ्या माथेरानचे आकर्षण आणि माथेरानचा आर्थिक कणा असलेली नेरळ – माथेरान मिनी ट्रेन आजपासून पुन्हा रुळावर आली आहे. तब्बल पाच महिन्यांनी माथेरानची राणी पुन्हा माथेरानकरांच्या भेटीला आली असल्याने राणीच्या स्वागताला नेरळ आणि माथेरानकर सज्ज झाले होते.
आज दिनांक ६ नोव्हेंबर, बुधवार पासून दररोज नेरळ – माथेरान मिनी ट्रेनच्या रोज दोन फेऱ्या होणार आहेत. तर सकाळी एक मालवाहू गाडी पाठवली जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव मिनी ट्रेनची सेवा बंद केली जाते. त्याप्रमाणे ८ जूनपासून नेरळ – माथेरान मिनी ट्रेन बंद होती. दसरा किंवा १५ ऑक्टोबर पासून मिनी ट्रेन पुन्हा सुरू होते. यावेळी हे दोन्ही मुहूर्त टळले होते. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून माथेरानची राणी धावणार, अशी चर्चा होती मात्र तोही मुहूर्त टळून गेला.
अखेर आज ६ नोव्हेंबरवर मध्य रेल्वेने शिक्कामोर्तब करत माथेरानच्या राणीला हिरवा झेंडा दाखविला. पावसाळ्यात अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू होती. तरीही पर्यटकांना नेरळ – माथेरान सेवेची प्रतीक्षा होती.
नेरळ माथेरान मार्गाची दुरुस्ती अखेरच्या टप्प्यात होती आणि विस्टा डोम डब्यांसह वाफेच्या इंजिनाचा लूक असलेले इंजिन नेरळच्या लोको शेडमध्ये अगोदरच आणले होते. त्याची चाचणी केली जात असल्याने पर्यटकांची मिनी ट्रेनची प्रतीक्षा लवकरच संपणार, असे चित्र दिसत होते.
दिवाळीनंतर मिनी ट्रेन सुरू झाली असल्यामुळे आता येथील व्यावसायिकांची मदार ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या सुट्ट्यांवर असणार आहे. सोमवार ते शुक्रवार रोज सकाळी एक मालवाहू ट्रेन सोडली जाणार आहे. यासह अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरु असून सोमवार ते शुक्रवार शटल सेवेच्या रोज सहा फेऱ्या आणि शनिवार, रविवारी आठ फेऱ्या होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मिनी ट्रेनचे वेळापत्रक
नेरळ-माथेरान
सकाळी ८.५० वा.
सकाळी १०.२५ वा.
शटल सेवा वेळापत्रक
माथेरान ते अमन लॉज
स. ८.२० वा. (रोज)
स. ९.१० वा. (रोज)
स. १०.०५ वा. (शनिवार, रविवार)
स. ११.३५ वा. (रोज)
दु. १.१०वा. (शनिवार, रविवार)
दु. २ वा. (रोज)
दु. ३.१५ वा. (रोज)
सायं. ५.२० वा. (रोज)
अमन लॉज ते माथेरान
स. ८.४५ वा. (रोज)
स. ९.३५ वा. (रोज)
स. १०.३० वा. (शनिवार, रविवार)
दु. १२ वा. (रोज)
दु. १.३५ वा. (शनिवार, रविवार)
दु. २.२५ वा. (रोज)
दु. ३.४० वा. (रोज)
दु. ५.४५ वा. (रोज
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे