मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

निरपेक्ष वहिनीं बद्दलचा जिव्हाळा

निरपेक्ष वहिनीं बद्दलचा जिव्हाळा


शिवसेना भायखळा विधानसभेतील असंख्य इमारती,चाळ,वाड्या आणि टाॅवर मधील प्रत्येक घराघरातला आमदार सौ यामिनी यशवंत जाधव यांच्या बद्दलचा जिव्हाळा पाहून मन भारावून जाते आणि असलेला जनसंपर्क पाहून मन थक्क हि होवून जाते.

पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक प्रचाराचे श्रीफळ दत्ताराम लाड मार्गावरील बालवीर नवरात्र उत्सव मंडळाच्या मंडपाजवळ दिग्विजय भवानीच्या साक्षीने तिच्याच चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात केली होती.

त्यावेळी उपस्थित दिग्विजय गृहसंकुलातील माता भगिनी आणि नागरीकांनी आमदार सौ यामिनी यशवंत जाधव वहिनींना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या होत्या.

महिनाभर निवडणूकांची रणधुमाळी उडाली होती.

आणि त्यानंतर शिवसेना उमेदवार सौ. यामिनी यशवंत जाधव आमदार म्हणून निवडून आल्या.


 सन २०१९ ते २०२४ या ५ वर्षांच्या काळात आमदार सौ यामिनी वहिनींनी लोकांच्या पायाभूत सुविधा आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी पराकोटीचा प्रयत्न केला. विधानसभेतील प्रत्येक सामाजिक कामासंबंधी त्यांनी आवाज उठवला आहे.

भायखळा वासियांच्या मुलभूत सुविधांसाठी त्यांनी महापालिका आणि राज्य प्रशासनाला प्रत्येक वेळी धारेवर धरले आहे.

म्हणूनच विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

भायखळ्यातील प्रत्येक जाती-धर्मांचे सण उत्सव असो किंवा कोणाच्याही घरी सुख- दुःख असो आमदार म्हणून त्या प्रत्येक ठिकाणी यामिनी यशवंत जाधव यांनी ऋणानुबंध जपला आहे.

त्यामुळेच एक अतुट नाते संपूर्ण विधानसभेतील घराघरात यामिनी वहिनींचे झाले आहे.

आजमितीला ती विधानसभेत सखी,काकी, वहिनी,ताई, माई आणि आजी अशा विविध नात्याने जोडली आहे.

वहिनीं सोबत असलो की  वहिनी साहेबांना हमखास भेटायला प्रत्येक स्थानिक एक  व्यक्ती येत असे आणि ती व्यक्ती तिथल्या स्थानिक जागे संबंधित वहिनीशी तिथे घडलेला ऋणानुबंधाचा प्रसंग सांगून वहिनींना गहिवरून आल्याशिवाय रहायचा नाही.

आजपर्यंत राजकारणात असंख्य व्यक्ती पाहिल्या पण...  राजकारणात निस्वार्थी हेतूने केवळ समाधानासाठी ऋणानुबंध जपणारी एक वात्सल्य मुर्ती मी यामिनी यशवंत जाधव वहिनींच्या रूपात पाहतोय..

आगामी येणाऱ्या २० नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्या यामिनी ताईंना भरभरून मतदान करून शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा देवून त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून विधानसभेत पाठवणे आपलं आद्य कर्तव्य आहे. हिच त्यांच्या कार्याची पोचपावती आपण मतदारांनी देवून त्यांना गौरविले पाहिजे.

भायखळ्याच्या विकासाचे शिव धनुष्य आमदार सौ यामिनी यशवंत जाधव यांनी लिलया पेलले आहे.

म्हणूनच या निवडणुकीत धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वांनी यामिनी यशवंत जाधव यांचाच प्रचंड मतांनी विजय करायचा आहे.

विकासाचे नवे पर्व आणि बदलणारा भायखळा पाहण्यासाठी आमदार सौ यामिनी यशवंत जाधव यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.

शुभेच्छुक.

सुनील सावंत.

रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट