Breaking News
वयाच्या १६ व्या वर्षीही काढता येते ड्रायव्हींग लायसन्स
मुंबई - अगदी शालेय वयातच मुलामुलींना दुचाकी, चारचाकी वाहनावर स्वार होण्याची क्रेझ वाटत असते. नियमानुसार १८ वर्षपूर्ण झालेल्या व्यक्तीलाच अधिकृतपणे ड्रायव्हिंग लायसन मिळू शकते. मात्र काही नियमांचे पालन करून १६ व्या वर्षी देखील लायसन्स काढता येऊ शकते. मोटार वाहन कायदा १९८८ नुसार वयाच्या १६ व्या वर्षीही ड्रायव्हिंग लायसन्स काढता येते. पण, त्यासाठी पुढील अटी पूर्ण कराव्या लागते.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या चॅप्टर २ मधील मोटार वाहनचालकांच्या परवान्याच्या चौथ्या मुद्द्यात ही माहिती देण्यात आली आहे. यानुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवता येत नाही. पण, परवाना मिळाल्यानंतर १६ वर्ष वयाच्या व्यक्तीला ५० सीसीपेक्षा कमी क्षमतेचे वाहन चालवता येते.
पण, तो इतर कोणतेही वाहन त्या वयात चालवू शकत नाही, त्यासाठी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया सामान्य ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासारखीच आहे.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या चॅप्टर २ मधील मोटार वाहनचालकांच्या परवान्याच्या चौथ्या मुद्द्यात ही माहिती देण्यात आली आहे. यानुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवता येत नाही. पण, परवाना मिळाल्यानंतर १६ वर्ष वयाच्या व्यक्तीला ५० सीसीपेक्षा कमी क्षमतेचे वाहन चालवता येते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर