मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या

धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या

मुंबई :  राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा, ओबीसी, धनगर इत्यादि समजाकडून आपल्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन सरकारकडे या मागण्या लावून धरल्या आहे. मात्र, राज्यात धनगड ही जातच अस्तित्वात नाही, असे वारंवार धनगर नेत्यांकडून सांगितले जात होते. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याने धनगर समाजाचे कार्यकर्ते मंत्रालयात आंदोलक करत आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पाऊल उचलले आणि थेट सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलकांना बाहेर काढलं आहे. 

धनगर आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस जोर धरत आहे. याच मुद्द्यावरून एक दिवसाआधी डॉ. सुधाकर शिंदे यांनी एक अहवाल दिला होता. ज्यामध्ये इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आदिवासींची प्रमाणपत्र दिल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पाच राज्यांच्या अभ्यासामध्ये शिंदे समितीला काही पुरावे  मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण द्यायचं की नाही याबाबत स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीचा जवळपास एक हजार पानांचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. हा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकी समोर येणार होतो. पण मंत्रिमंडळाच्या बैठकी रद्द करण्यात आल्या. त्यामुळेच कुठे तरी धनगर समाज आज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.  


रिपोर्टर

संबंधित पोस्ट