Breaking News
लालबागमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चा
मुंबई - ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणीटंचाईने महिला त्रस्त आहेत. याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज (ता. ८) शिवडी-परळ विभागातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयावर धडक हंडा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात स्थानिक नागरिक, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. गरिबांना त्रास दिला जात असून सरकारचे गरिबांकडे लक्ष नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.येत्या दसऱ्यापर्यंत हा पाणीप्रश्न सुटलाच पाहिजे, असा इशारा पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिला.
पाणीप्रश्नावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने केली. ज्या
विभागात विरोधी पक्षातील आमदार आहे; त्या-त्या भागातील स्थानिकांना जाणूनबुजून त्रास देण्याची, त्यांच्या समस्या वाढवण्याची शिंदे-भाजप सरकारची नीती आहे, पण या सत्ताधाऱ्यांपुढे आम्ही कधीच हतबल होणार नाही, असा निर्धार आमदार चौधरी यांनी या वेळी व्यक्त केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे