Breaking News
भारतीय बाजारात दाखल झाला या कंपनीचा भव्य 100 इंची TV
मुंबई - AKAI कंपनीनं भारतात दोन नवीन QLED टीव्ही लाँच केले आहेत. याचा आकार 75 आणि 100 इंच आहे. या टीव्हीमध्ये चांगल्या व्यूइंग एक्सपीरियन्ससाठी HDR 10+ आणि Dolby Vision चा सपोर्ट देण्यात आला आहे. यात Dolby Atmos चा सपोर्ट मिळतो. तसेच, नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये Google Play, Miracast आणि Google Assistant देण्यात आला आहे. या नावाचे टीव्हीमध्ये बिल्ट-इन Chromecast देखील आहे त्यामुळे तुम्ही Netflix, Prime Video सारखे ओटीटी अॅप्सचा आनंद घेऊ शकता.AKAI च्या 75 इंचाच्या 4के क्यूएलईडी टीव्हीची किंमत 99,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच, 100 इंचाचा 4के क्यूएलईडी प्लस टीव्ही 3,99,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
या स्मार्ट टीव्हीमध्ये 16GB स्टोरेज आणि 2GB रॅम मिळतो. यात गेम मोड, MEMC, क्रोमकास्ट आणि व्हॉइस असिस्टंट आहे. तसेच, ब्लूटूथ, वायफाय, 3 एचडीएमआय, 2 यूएसबी आणि Ethernet पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. तसेच, हा टीव्ही अँड्रॉइड 11 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
अकाईच्या नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये बेजल-लेस डिजाइन देण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये 75 इंच आणि 100 इंचाचा 4K QLED+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन 3840 x 2160 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात Dolby Vision, HDR10 आणि HLG चा सपोर्ट देण्यात आला आहे. यात Dolby Atmos देखील देण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar