मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नंदकुमार काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन


मुंबई : 

जनसेवेचे बांधून कंकण 

त्रिभुवन सारे घेई जिंकून 

अर्पून अपुले दृढ सिंहासन

जिंकत जाई जनतेचे मन


वरील ओळी ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सांगड घालतात त्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.चे संचालक तसेच अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्यादितचे माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर यांचा वाढदिवस २२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. 


अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासंदर्भात अग्रणी भूमिका घेऊन रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नांचे फळ म्हणून शासनाने अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत जलदगतीने निर्णय घेतला. 


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राज्याच्या लोकाभिमुख, लोकप्रिय आणि गतिमान महायुती सरकारने नैतिक मूल्य जपत आपल्यावरील सामाजिक बांधिलकीचा विश्वास कायम राखत अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासंदर्भात आपण उच्चाधिकार समिती व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनार्विकासाचा मार्ग सुकर केला.


अशा धडाकेबाज कार्य करत असलेल्या नंदकुमार काटकर यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या हितचिंतकांसाठी सोहळाच असतो. त्यानिमित्ताने दिसभर त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची रिघ लागलेली असते. 


युवा उद्योजक तसेच आदर्श स्वराज्यचे संपादक उदय अशोक पवार, बेरोजगार संस्थेचे राजेंद्र काळे, मयूर काळे, उद्योजक राजेश पुजारी यांनी नंदकुमार काटकर यांना भावी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट