मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

धारावीत तणावपूर्ण स्थिती! मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद ...

धारावीत तणावपूर्ण स्थिती! मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद ...

मुंबई : मुंबईच्या धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. धारावीत आज सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं. तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनूसार धारावीच्या परिसरात एक मशिद आहे. या मिशिदीचा काही भाग अवैध असल्याचं सांगितलं जातंय. धारावीतील हिमालया हॉटेल जवळची मेहबुबे सुभानिया मशिदवरील तोडक कारवाई करण्याची नोटीस मुंबई महानगरपालिकेने पाठवली होती. सदरची मशिद ही अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. त्यामुळे आज सकाळी मुंबई महानगरपालिकेचं पथक हा अवैध भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले होते. बीएमसीचं पथक आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडवले. तसेच बीएमसीच्या गाडीच्या काचाही फोडल्या. तसेच काही नागरिक रस्त्यावर बसले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट